Find Jobs
Hire Freelancers

कलावंत:एक व्हिलन हृदयस्पर्शी कहानी

$750-1500 USD

Κλειστή
Αναρτήθηκε πάνω από 6 χρόνια πριν

$750-1500 USD

Πληρωμή κατά την παράδοση
आयुष्य घडवणारे कलावंत, आई-बाबांच्या चरणी सप्रेम अर्पण...! या कथेतील पात्र, नावे, ठिकाण, वेळ आणि घटना काल्पनिक आहेत. वास्तवात कुठलाही संबंध आल्यास,कुठल्याही प्रकारची मानहानी किंव्हा अपमानास्पद विधान नसून तो निव्वळ योगायोग मानावा. ले.सिद्धाराम. मल्लिकार्जुन पुजारी प्रास्ताविक   माणूस यशाच्या शोधत असतो, तेव्हा कष्टाची जण असते. कुठलाही काळ स्थिर नसतो. वेळेनुसार बदल घडवून यावा. जनमानसात सितारा म्हणून मिरवणारे अण्णा आयुष्यात खूप चढउतार पाहिले. ते एकनिष्ठीने आयुष्य जगले. एखादा प्रसंग किव्हा चूक माणसाला कुठल्याही प्रकारची हायगाय न करता बदला घेण्यात तातडी करतो. ज्यात अण्णा असफल राहिले; तो अण्णाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग होता.........   कलावंत : एक व्हिलन...? १५ ऑगस्ट, १९४७. भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस. भारतीयांनी या दिवसाची १५० वर्षे वाट पाहिले. आनंद उत्साह, नाच-गाणी, सभा-भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम अशा नाना तऱ्हेचे कार्यक्रम आयोजित करून आनंद साजरा केला गेला. १५ ऑगस्ट, १९४७. हा दिवस आणखी एका कारणासाठी खास आणि मौलिक आहे. ज्यांनी आपल्याला गेली तीन दशके खळखळून हसवले, जे पडद्यावर आले की प्रेक्षकांना वेड लागायचं, ज्यांच्या लेखनशैलीतून अनेक साहित्य उदयास आले, ज्यांची पटकथा, ज्याचं दिग्दर्शन, ज्यांची चित्रपट अख्या जगाला भावले, अभिनयाचे चक्रवर्ती, थोड्याशा चित्रकलेला व्यंग नाव देऊन राजकीय नेत्यांना आणि पक्षांना कोंडी करणारे, आपल्या सिंहगर्जनेतून छाती ठोकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी गांभीर्याने सांगून; मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ अभिनेते, जाणते दिग्दर्शक, सुजाण साहित्यिक, व्यंगचित्रकार, नाटककार, दमदार वक्ते, एक नव्यापिढीचे दिग्गज कलावंत, कलाभूषण, कलातपस्वी आणि महान व्यक्तिमत्त्व, सर्वांचे लाडके "अण्णा" उर्फ अण्णासाहेब नीलकंठ गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांचा घराण्याचा अण्णाच्या घराशी कधीच संबंध आला नाही. मूळ पुणे जिल्ह्यातील खेडचे. अण्णाच्या वडिलांना मॅट्रिकोत्तर नोकरी लाभली; अन घर पुण्यातच झालं. मग अण्णांचं बालपण, शाळा, शिक्षण पुण्यातच झालं. अण्णांना शिक्षणात रस कधीच नव्हता, आबांच्या हट्टापायी बी.ए पर्यंतच शिक्षण पूर्ण करण्यात कसरतच झाली म्हणा. अण्णा लहानपणापासूनच कलेचे धनी. शाळा, कॉलेज मधल्या विविध कार्यक्रमात आणि स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवलेले अण्णा पुढे अख्या रंगमंचावर आणि चित्रपट सृष्टीवर राज्य करतील असं घरच्यांना संशय सुद्धा आलेलं नसताना आबांना मुलाचे पाय पाळण्यात दिसले. अण्णांची दिनचर्या काही निराळीच होती. पहाटे उठून गल्लीत एक फेरफटका मारून आल्यावर, स्वतः चहा बनवून आस्वाद घेत. मग आपल्या दहा बाय दहाच्या खोलीत चित्र काढणे, कविता-लेख लिहिणे, चित्रपटातील सवांद गुणगुणने.... नानातर्हेचे आवाज काढणे. दरवाजा बंद करून घेतले की अण्णा दुसऱ्याच दुनियेत हरवणार. स्वतःला कलेत इतकं झोकलेले की बाहेरून कोण बॉम्ब जरी फेकलं तरी त्यांना तो चित्रपटाचा एक चित्रित फित वाटायचा. एक दिवस तर आबांनी अण्णांना मुगल-ए-आजम या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या...! या अद्भुत आणि सुंदर गाण्यावर नृत्य करताना पाहिले; आबांना क्षणासाठी मधुबाला आठवल्या. आबांनी अण्णांवर विश्वास दाखवत, मुभा दिले. अण्णांनी दिवसरात्र एक करून त्यांचं पाहिलं "प्रेमांकुर" पुस्तक प्रकाशित केले. त्या काळी महान आणि दिग्गज लेखक व कवी कार्यरत असल्याने अण्णांच्या पुस्तकाला भावच मिळाला नाही. जेव्हा अण्णांनी जेष्ठ साहित्यीक आणि लेखकांची भेट घेतली आणि एक भव्य कार्यक्रम आयोजित केले. त्यात त्याच पुस्तकच पुनर्प्रकाशन करण्यात आलं. फक्त दिग्गज लेखक आणि साहित्यिकांची साथ अण्णांना कमी कालावधीत कनिष्ठ कालाकारांत स्थान मिळवून दिली. "पुष्पकुंज" गीतसंग्रहाने अण्णांना खरी ओळख निर्माण करून दिला. अण्णांची पुस्तकं, कादंबऱ्या, काव्यसंग्रह यांना चित्रपट जगताचे तत्कालीन जेष्ठ मराठी दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी मान दिला. "माझ्या पुस्तकांवर जर तुम्हाला चित्रपट तयार करायचा असेल तर माझी एक अट आहे." "चालेल." हा एक होकार महाराष्ट्रात एका निखळ अभिनेत्याला जन्म दिला. तत्कालीन आघाडीच्या अभिनेत्री सुमलता देगावकर आणि अण्णा यांच्या प्रेमाकुराच्या चर्चा वास्तव्य सत्यच होत्या. अण्णांचं प्रेम सुमलतांवर खूपच ऊतू जाणे, हे तरुणींना काहीसा बेचैनीचा काळ होता. महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी अण्णासारखा जोडीदार शोधण्यात होते. सगळ्यांच्या नशिबी अण्णा थोडीच होते. फुलणारं प्रेम खूप दिवस टिकू शकलं नाही, याचं कारणही तसंच होतं. सुमलतांचा पहिला प्रेमप्रकरण अण्णाच्या नशिबात तुफानच घेऊन आला आणि सुमलतांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. देगावकर घरण्याकडून अण्णांवर दबाव आणला जात होता, न्यायालयाने अंतिम निर्णयात जेंव्हा सुमलतांच्या प्रतिमेला मलिन शब्दाची जोड दिली; अण्णांना धक्काच बसला. अण्णांनी वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी निर्णय घेतला की आयुष्यात पुन्हा कधीच प्रेम आणि लग्न यांना कदापि माझ्या आयुष्यात स्थान नाही. अण्णांनी या भयावह स्वप्नाला विसरण्यासाठी स्वतःला इतकं व्यस्त केले की एकाच वर्षात सुमारे १२ चित्रपटात हजेरी लावली. ८ चित्रपटात तर नायकाच्या भूमिकेतच होते. बघता बघता अण्णा महाराष्ट्रातील तरुणाच्या गळ्यातील ताईत झाले आणि तरुणींचे आशास्थान..... आपल्या हलक्या आणि सहज अभिनयाने अख्या महाराष्ट्राला भारावून सोडणारे महान अभिनेते अण्णासाहेब महाराष्ट्र ते राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी होते. अण्णा आपल्या प्रत्येक चित्रपटातून आणि कलेतून समाजातील सर्व स्तरांपर्यन्त पोहोचले होते. ऐंशीच्या दशकापर्यंत अण्णांनी सुमारे पाच कादंबऱ्या, तीन काव्यसंग्रह, शंभराहून कथा, सुमारे सत्याहत्तर चित्रपट आणि असंख्य भाषणे दिले होते. धर्माचे पुरस्करते, राजकीय ज्ञानी अण्णा आपल्या वक्तव्यातून जनमानसात आपली प्रतिमा बिंबवलेले. नव्वदीच्या दशकात आघाडीचे अभिनेते म्हणून नावारूपास आलेले अण्णा; लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, मांजरेकर, अश्या दिग्गज अभिनेत्यांचे वरिष्ठ मार्गदर्शक होते. वर्ष १९९३. मुंबई बॉम्बस्फोट. मायनगरीला काळी रात्र दाखवणारी घटना. अण्णाच्या आयुष्यात एक भयंकर स्वप्न घेऊन आली. तीच घटना अण्णांच्या आयुष्यभराच्या कष्टावर पाणी फेरली. मुंबई बॉम्बस्फोटानंतरची पहिलीच सभा. गेली दोन-तीन वर्षे अण्णांनी एकही चित्रपट प्रदर्शित केले नव्हते. कार्यक्रमाला सुद्धा नकार कळवयाचे. हृदयाला चक्काचूर करणारी घटना, साऱ्या मुंबईकरांच्या आयुष्याला खाक करून टाकलेली. असल्या परिस्थितीत सभा घेणे, मनोरंजन करणे अण्णांना काही पटतच नव्हतं. मनाची श्रीमंती दाखवत अण्णांनी मुंबईच्या पुनर्बांधणीसाठी रक्कमही दिलेले. खूप दिवसांनी जनसागरासमोर भाषण देणे अण्णांना जरा जड वाटत होता. अण्णांना रात्री उशिरापर्यंत झोप लागली नाही. खोलीच्या छताकडे बघण्यात आणि पंख्याचा वेग मोजण्यात रात्र घालवले. ज्या अण्णांनी लग्नाला आजवर नकार देत होते, त्यांनी एका विशिष्ट हेतू आणि समाज प्रबोधनासाठी लग्न करायचं ठरवले. अण्णांना समाजकार्य खूप रुचकर वाटे. १९९२ सालच्या एका "विधवा आश्रयाश्रम, पुणे" सभेत अण्णांना एक हृदयद्रावक व्यथा भावली. कमलाबाई जेजुरीकर. कोवळ्या वयाच्या कमलाबाईंचा लग्न एका कारखान्यातील कामगाराशी झाला होता. विजेच्या झटक्याने त्यांचे पती काशिनाथ यांचा मृत्यू झाला होता. लग्नाला फक्त तीन वर्षे दोन महिने झाली होती. सासरचे कमलाबाईंच्या गृहप्रवेशावर खापर फोडलेले. स्वतःच्या पायावर उभी राहून कमलाबाईने विधवा आश्रयाश्रमचा गाडा चालवले. सुमारे चाळीस-बेचाळीस वयाच्या कमलाबाईंना पटवून देऊन विधवा पुनर्विवाहाचा विचार मांडला. पहिल्यांदा अण्णांना स्वतःची लाज वाटली. पण कमलाबाईंनी आपण कधीच हा आश्रयाश्रम सोडू शकत नसल्याचे सांगितले. अण्णांनी आपणही आश्रयाश्रमात घाम गाळू आणि समाजाला एक शिकवण देऊ याची हमी दिल्यानंतर कमलाबाई लग्नाला होकार दिल्या. अण्णाच्या आयुष्यात कधी लग्न नावाची गोष्ट आणि घटनाच घडली नाही. अण्णाचं लग्न खूप थाटामाटात करण्याच्या बेतात अख्खी मराठी चित्रपटसृष्टी एकवटलेली. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, दिलीप कुमार याना लग्नाचं आमंत्रण सुद्धा पोहोचलेली. अण्णांचा आवडता खेळ क्रिकेट. कपिलदेव, सुनील गावसकर, सचिन, अनिल कुंबळे, सिद्धू यांच्याशी महाराष्ट्रातील काही कार्यक्रमात मुलाखती आणि चर्चा होत होती. दिग्गज खेळाडू, अभिनेते, पुढारी, लेखक, कवी, चित्रकार, आणि महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लग्नात उपस्थिती लावणार म्हणून पुणेकरांना खूप आनंद झाला होता. लग्नाला काहीच दिवस उरलेले असताना मुंबईत दुर्घटना घडली आणि लग्न अण्णाच्या आयुष्यात स्वप्न बनून राहील. रात्रभर अण्णांनी भुताशी संवाद घालण्यात घालवले. आबा अजून झोपलेले होते. अण्णांनी पहाटेच्या प्रहरातच रोजचा व्यायाम, अंघोळ आणि आवराआवर करून भाषणाच्या मुद्द्यांवर मनन करत होते. अण्णांनी बॉम्बस्फोटाच्या बाबतीत जरा जपूनच भाष्य करण्याच्या उद्देशाने उठले. या आधी लग्न, आत्महत्या, कोर्ट कचेरी यांचा वाईट परिणाम अण्णांच्या चित्रपट कमाईवर झाला होता. "आबा उठा, जायचंय लवकर." अण्णांनी हाक दिली. लाखो जनसमुदायला पाहून अण्णा भारावून गेले. अण्णांना पाच-सहा वर्षाखालील "मराठी सितारा अभिनय चक्रवर्ती अण्णा" या त्यांच्या चाळिसाव्या वाढदिवसाची आठवण झाली. महाराष्ट्र सरकार आणि मराठी चित्रपट सृष्टी यांच्या विद्यमाने अण्णाच्या कलेला मानवंदना देण्यासाठी साल १९९१ रोजी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अण्णांना पापण्या ओल्या झाल्याचे जाणवले. अण्णांनी असे अनेक प्रसंग जवळून अनुभवलेले. आजचा दिवस अण्णांसाठी खूपच खास होता. अण्णांना आपलंसं ते सगळं परत मिळतंय असा भास झाला. सुत्रसंचालकांनी अण्णांचा सत्कार संपताच माईक हातात देऊन भाषणाला सुरुवात करण्यास सांगितले. अण्णांना काय बोलावे कळतं नव्हतं. "आदरणीय जनसमुदाय, सुप्रभात." "व्यासपीठावरून खाली उतरून खूप दिवस झाले. बोलण्यात किंव्हा भाषेत कळत न कळत त्रुटी आढळली तर माफ करावे." अण्णांनी आपल्या सवयीने भाषणाला सुरुवात केले. गेली पस्तीस मिनिटे कुणाचीच नजर अण्णांवरून हटत नव्हती. जी चूक आयुष्यात कधीच नाही विसरू शकत अशी चूक अण्णांनी केली. "मला मुंबईच्या बॉम्बस्फोटाबद्दल खूप खेद वाटते. मन कळवल्यासारखं वाटतं." अण्णा एका गोष्टीत आकंठ बुडाले की मग त्यांचं भान ठिकाणावर नसतं. "मला खुप वाईट वाटतं की आम्ही आत्ता भारतात सुरक्षित राहू शकत नाही. एक इस्लाम येतो आणि भारतावर घाव करतो, त्याला साथ म्हणून हिंदू निर्लज्जपणे बघत उभा. शरम येतो साल्या असल्या जिंदगीवर. लाज कसं वाटत नाही असल्या हरामी आणि दलाली माणसाला." ज्या कोपऱ्यात मी उभा होतो, त्या बाजूला काही महाविद्यालयीन विद्यार्थी उभे होते. अण्णा चुकत आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं. मी ही एका वृत्तपत्राचा संपादक होतो, अनेक वेळा अण्णांशी चर्चा झाली होती. जरी अण्णांचं खरं असलं तरी जातीय भाष्य अण्णांना त्या दिवशी आयुष्याच्या त्या स्तराला घेऊन गेला की कोणालाच आज अण्णा आठवत नाहीत. महाराष्ट्रात अनेक दंगली झाले. त्या कार्यक्रमात अण्णांवर लोकांनी हल्ला केला होता, आणि अण्णांना त्यांची चूक वेगळ्याच भाषेचे समजावलेले. खरं तर अण्णा एकनिष्ठ आणि रक्ताचे वक्ते होते. अण्णांनी खऱ्या अर्थाने भारताला आपली चुक दर्शवत होते. हल्ल्यात अण्णांना खूपच दुखापत झाली. अण्णांना त्याचं काहीच वाटलं नाही. पण ज्या मनावर घाव झाल्या होत्या त्या बुजण्यासारखे नव्हते. अण्णांनी लक्षात घ्यायला हवं होतं की भारतात लोक देशाला नाही तर जातील महत्त्व देतात. खऱ्या अर्थाने ही एका कलाकाराची हार होती. जे आयुष्यभर समाजासाठी, देशासाठी झटले होते. आज एका भाषणाने आणि सत्याने गेल्या चार दशकाच्या वाहवाहला राख केले. देशाने अण्णांना देशद्रोही हा किताब दिला. मला खरं तर वाईट न वाटता हसू आलं. कारण एक ब्रेकिंग न्यूज माझ्याकडे आला. कोणी जातीसाठी, कोणी देशासाठी, कोणी अण्णांसाठी लढतो आहे तर........... एका प्रख्यात वृत्तपत्राने आपल्या प्रचारासाठी आणि फायद्यासाठी ठळक बातमी म्हणून जेव्हा छापले की "अण्णा : एक व्हिलन". मी मनातल्या मनात स्मितहास्य केलो आणि मनाला विचारलो "कलावंत : एक व्हिलन?"
Ταυτότητα εργασίας: 15314159

Σχετικά με την εργασία

Απομακρυσμένη Εργασία
Ενεργός/ή 6 χρόνια πριν

Ψάχνεις τρόπο για να κερδίσεις μερικά χρήματα;

Πλεονεκτήματα πλειοδοσίας στο Freelancer

Καθόρισε τον προϋπολογισμό σου και το χρονοδιάγραμμα
Πληρώσου για τη δουλειά σου
Περίγραψε την πρόταση σου
Η εγγραφή και η πλειοδοσία σε εργασίες είναι δωρεάν

Σχετικά με τον πελάτη

Σημαία της INDIA
India
0,0
0
Μέλος από Οκτ 3, 2017

Επαλήθευση Πελάτη

Ευχαριστούμε! Σου έχουμε στείλει ένα email με ένα σύνδεσμο για να διεκδικήσεις τη δωρεάν πίστωση σου.
Κάτι πήγε στραβά κατά την προσπάθεια αποστολής του email σου. Παρακαλούμε δοκίμασε ξανά.
Εγγεγραμμένοι Χρήστες Συνολικές Αναρτημένες Δουλειές
Freelancer ® is a registered Trademark of Freelancer Technology Pty Limited (ACN 142 189 759)
Copyright © 2024 Freelancer Technology Pty Limited (ACN 142 189 759)
Φόρτωση προεπισκόπησης
Δόθηκε πρόσβαση για Geolocation.
Η σύνδεση σου έχει λήξει και τώρα έχεις αποσυνδεθεί. Παρακαλούμε συνδέσου ξανά.